पुरंदर रिपोर्टर लाईव्ह
सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) –
सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या मनीषा भगवानराव गोफणे (खंडोबाची वाडी) यांची उबाटा शिवसेना महिला उपजिल्हा संघटिका पदी निवड करण्यात आली आहे. पुणे येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या विशेष कार्यक्रमात त्यांच्या निवडीचे पत्र पक्षाचे ज्येष्ठ नेते सचिन अहिर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या वेळी शिवसेना नेत्या ज्योतीताई गाडे, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, संपर्कप्रमुख अधिराज कोठडीया, बारामती विभाग प्रमुख भगवान गोफणे तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
खंडोबाची वाडीचे माजी उपसरपंच भगवान गोफणे यांच्या पत्नी मनीषा गोफणे सामाजिक आणि राजकीय कार्यात नेहमीच सक्रिय असून निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मनीषा गोफणे म्हणाल्या, “मी उबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची आभारी आहे. शिवसेना पक्षाचे ध्येय, धोरणे आणि कार्य प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे.


0 Comments